
Viksit Bharat@2047 बद्दल माहिती प्राप्त करण्यासाठी WhatsApp चॅनेलचे अनुसरण करा: तरुणांचा आवाज
विकसित भारत@2047: युवाओं की आवाज के बारे में जानकारी प्राप्त करने के लिए व्हाट्सएप चैनल को फॉलो करें ।
आता फॉलो कराविकसित भारत@2047

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी धर्मेंद्र प्रधानजी, देशभरातील राज्यपाल, शिक्षण जगतातील मान्यवर, स्त्री आणि पुरुषहो!
विकसित भारताच्या संकल्पांसंदर्भात आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. मी सर्व राज्यपालांचे विशेष अभिनंदन करतो की त्यांनी विकसित भारताच्या निर्मितीशी संबंधित या कार्यशाळेची व्यवस्था केली आहे. देशाच्या युवा शक्तीला दिशा देण्याचे काम ज्यांच्यावर आहे, अशा मित्रांना तुम्ही एका व्यासपीठावर आणले आहे. शैक्षणिक संस्थांची भूमिका व्यक्तीचा विकास करण्याची असते, आणि केवळ व्यक्तीच्या विकासाच्या माध्यमातूनच राष्ट्राची निर्मिती होते. आणि आज भारत ज्या काळात आहे, त्या काळात व्यक्तिमत्व निर्मितीची मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. व्हॉईस ऑफ यूथ कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा.
मित्रांनो,
इतिहास प्रत्येक देशाला विकासाच्या प्रवासाला अनेक पटींनी पुढे नेणारा काळ देतो. एकप्रकारे त्या देशाचा हा सुवर्णकाळ (अमृतकाल) आहे. भारतासाठी हा सुवर्णकाळ (अमृतकाल) आहे. हा भारताच्या इतिहासातील असा काळ आहे, जेव्हा देश एक मोठी झेप घेणार आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक देशांची उदाहरणे आहेत, ज्यांनी ठराविक वेळेत अशीच क्वांटम झेप घेऊन स्वत:चा विकास केला आहे. म्हणूनच मी म्हणतो; भारतासाठीही हीच योग्य वेळ आहे. या सुवर्णयुगाच्या प्रत्येक क्षणाचा आपल्याला लाभ घ्यावा लागेल; एक क्षणही वाया घालवू नये.
सर्वोत्तम कल्पनांसाठी पुरस्कार
प्रत्येकी 5 विषयक क्षेत्रांत 3 पारितोषिके सर्वोत्कृष्ट कल्पनांना दिली जातील:

प्रथम पारितोषिक: 5 लाख रुपये

दुसरे पारितोषिक: 3 लाख रुपये

तिसरे पारितोषिक: 2 लाख रुपये