NTA च्या माध्यमातून आयोजित परीक्षा प्रक्रियेवरील सुधारणांबाबत तुमच्या सुचना शेअर करा

पार्श्वभूमी

भारत सरकारने खालील पैलूंवर शिफारसी करण्यासाठी 22 जून 2024 रोजी ISRO चे माजी अध्यक्ष आणि IIT कानपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सरकार, सरकारी संस्था, शैक्षणिक आणि उच्च शिक्षण संस्थांच्या सदस्यांचा समावेश असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे:

  • परीक्षा प्रक्रियेच्या यंत्रणेत सुधारणा,
  • डेटा सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये सुधारणा, आणि
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीची (NTA) रचना आणि कार्य

या संदर्भात विविध भागधारकांकडून विशेषतः विद्यार्थी आणि पालकांकडून सूचना, मते आणि कल्पना जाणून घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

वेळ

प्रारंभ तारीख: 27 जून, 2024
अंतिम तारीख: 07 जुलै, 2024