इंडिया-पिच-पायलट-स्केल-स्टार्टअप चॅलेंज

पार्श्वभूमी

भारतातील समृद्ध स्टार्ट-अप परिसंस्थेमुळे उदयास येणारे नवीन तंत्रज्ञान काही गंभीर आव्हानांवर यशस्वी उपाय उपलब्ध करून देत आहेत. अटल मिशन फॉर रिजुव्हेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 2.0 (अमृत 2.0) चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणजेच नावीन्यपूर्ण उपाय विकसित करून आणि शहरी पाणी व सांडपाणी क्षेत्रातील गुंतागुंत दूर करून शहरी जल सुरक्षित करणे यासाठी या परिसंस्थेचा वापर करणे आवश्यक आहे.

अमृत 2.0 चे उद्दिष्ट आहे सर्व वैधानिक शहरांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी, 500 अमृत शहरांमध्ये सांडपाणी आणि सेप्टेज व्यवस्थापनाची व्याप्ती वाढवण्यासाठी, (शहरी ओसाड जमिनीसह) जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि हिरव्या जागांची निर्मिती करण्यासाठी केंद्रीय सहाय्य प्रदान करणे. त्याचप्रमाणे, तंत्रज्ञान उप-मिशन अंतर्गत नाविन्यपूर्ण उपायांना प्रोत्साहन देणे देखील अमृत 2.0 चा उद्देश आहे. या मिशनचे ध्येय आहे पाणी आणि वापरलेल्या पाण्याचे शुद्धीकरण, वितरण आणि जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन या क्षेत्रात नाविन्यपूर्ण, सिद्ध झालेल्या आणि संभाव्य पर्यावरण अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करणे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्टार्ट अप्सना शहरी जलक्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

इंडिया वॉटर पीच-पायलट-स्केल स्टार्ट-अप चॅलेंज

भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA), भारतातील शहरी जलक्षेत्रातील आव्हाने सोडविण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, व्यावसायिक उपाय प्रदान करण्यासाठी इच्छुक/पात्र स्टार्ट-अप्सकडून अर्ज/ प्रस्ताव मागवण्यासाठी अनोखे स्टार्टअप चॅलेंज आयोजित केले आहे.

हे चॅलेंज कायमस्वरुपी असेल. पुरेशा संख्येने अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांचे मूल्यमापन करून निकाल जाहीर केला जाईल.

ध्येय

या चॅलेंजचा उद्देश आहेशहरी जलक्षेत्रातील आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी स्टार्ट अप्सना उपाय मांडण्यासाठी, सुरू करण्यासाठी व वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे. या चॅलेंजची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

  • तांत्रिक तसेच व्यवसायिक उपाय / नवकल्पना ओळखणे.
  • विविध आकार, भौगोलिक आणि शहरांच्या वर्गासाठी योग्य असलेल्या व्यवहार्य उपायांचे समर्थन करा.
  • निवडक शहरांमध्ये निवडलेले तंत्रज्ञान / उपाय यांची व्याप्ती मोजण्यासाठी प्रायोगिक चाचणी / प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिक आणि वैयक्तिक सहाय्य पुरवणे.
  • नवकल्पना मांडणारे / उत्पादक आणि लाभार्थी - म्हणजेच ULB, नागरिकांमधील अंतर कमी करणे.
  • जलक्षेत्रात स्टार्ट अपची परिसंस्था निर्माण करणे.
  • भारतीय स्टार्टअप्स आणि तांत्रिक उपायांना प्रोत्साहन देऊन 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा प्रचार करणे.
  • उपायांच्या अंमलबजावणीसाठी खाजगी क्षेत्र, संस्था, उद्योग संघटना इत्यादींशी भागीदारी करणे.

विषयासंबंधित क्षेत्र

खालील क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान/व्यवसायिक उपाय प्रदान करणारे स्टार्ट-अप्स यामध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत:

  1. ताजे पाणी प्रणाली
    1. भूजल गुणवत्ता / पृष्ठभागाच्या पाण्याच्या गुणवत्तेचे प्रत्यक्ष वेळेत स्पेटिओ-टेम्पोरल मॅपिंग
    2. जलवाहिन्या आणि पृष्ठभागावरील पाण्याची पातळी / साठ्याचे प्रत्यक्ष वेळेत स्पेटिओ-टेम्पोरल निरीक्षण
    3. किमान पाणी आणि कार्बन फुटप्रिंटसह भूजल आणि पृष्ठभागाच्या पाण्यासाठी निसर्ग-आधारित उपचार प्रणाली
    4. अभिनव रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली
    5. वातावरणीय पाणी पुनर्प्राप्ती प्रणाली
  2. हायड्रो इन्फॉर्मेटिक्स पाण्याचा + डेटाचा वापर करून
    1. पूर आणि दुष्काळ रोखण्यासाठी उत्तम पाणी व्यवस्थापन करणे
    2. पेरी-शहरी समुदाय किंवा शहरी झोपडपट्टीधील लोकांच्या आरोग्य आणि आर्थिक समृद्धीवर चांगला परिणाम करणे
    3. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात पाण्याचा आभासी अंदाज लावणे आणि त्याद्वारे पाण्याची वाजवी किंमत ठरवणे
  3. वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन
    1. झोपडपट्ट्यांसाठी ऑन-साइट स्वच्छता उपायांसह सांडपाणी आणि सेप्टेजचे उत्तम व्यवस्थापन
    2. उद्योगांमध्ये वापरलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करण्यासाठी तंत्रज्ञान
    3. वापरलेल्या पाण्याच्या व्यापारासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल
    4. वापरलेल्या पाण्यापासून पुन्हा मूल्य प्राप्त करणे आणि चक्राकार अर्थव्यवस्था तयार करणे
    5. उपचार तंत्रज्ञान, विशेषतः डोंगराळ प्रदेशासाठी
  4. शहरी पाणी व्यवस्थापन
    1. भूजल पुनर्भरण, ग्रेवॉटर मॅनेजमेंट, सांडपाणी पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापन यांना प्रत्यक्ष वेळेतील गुणवत्ता आणि भरपूर माहितीसह जोडणाऱ्या समुदायांसाठी विकेंद्रीकृत चक्राकार अर्थव्यवस्था उपाय
    2. झोपडपट्टयांसाठी विकेंद्रीकृत पाणीपुरवठा उपाय
    3. नद्या, तलाव, तली, उथळ जलवाहिन्या यांचे पुनर्भरण आणि जतन
    4. शहरी पूर आणि वादळी पाण्याचे व्यवस्थापन
    5. शहरी जलवाहिनी प्रणालीचे मॅपिंग आणि व्यवस्थापन
    6. समुद्र किनाऱ्यावरील शहरी वस्त्यांमध्ये खारटपणाचा शिरकाव
    7. पाणी सेवा वितरण मानकांची (गुणवत्ता, प्रमाण आणि मिळवण्याची क्षमता) देखरेख करणे
    8. पाणी मीटरिंग
    9. पाण्याच्या नियंत्रित निचरा / पाणी नाकारण्यासह त्याचा खारटपणा कमी करणे
    10. कार्यक्षम फ्लो पॉलिमर / मेटल प्लंबिंग फिचर्स ज्यामध्ये एरेटरशिवाय नळ समाविष्ट आहे
    11. उच्च पुनर्प्राप्ती / कार्यक्षमता असलेली RO प्रणाली
    12. पाणी जतन करण्यासाठी किंवा पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी रेट्रोफिटिंग साधने
    13. डोंगराळ भागासाठी नावीन्यपूर्ण पाणीपुरवठा उपाय
  5. कृषी जलव्यवस्थापन
    1. ऊर्जा, खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्याबरोबरच प्रतिटन पिकासाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करणे
    2. AI-ML आधारित प्रणाली ज्या शेतकऱ्यांचे पावसाळ्यावरचे अवलंबित्व कमी करण्यास मदत करतात
  6. शहरी सांडपाणी व्यवस्थापन
    1. झोपडपट्ट्यांसाठी प्रत्यक्ष जागेच्या स्वच्छता उपाय यासह सांडपाणी आणि सेप्टेजचे उत्तम व्यवस्थापन
    2. गंधहीन, पाणी नसलेली युरीनल
  7. पाणी प्रशासन
    1. रेव्हेन्यू नसलेले पाणी कमी करणे
    2. नळावर पिण्यायोग्य पाण्याचा 24X7 पुरवठ्यासाठी सुरक्षित प्रणाली
    3. पाण्याविषयी शिक्षण व जनजागृती करणे
    4. शून्य पाणी आणि शून्य कचरा प्रकल्पांना लक्ष्य करणे
    5. पाणी आणि ऊर्जा युती दर्शवणे
    6. पाणी पॅकेजिंगसाठी शाश्वत उपाय
  8. पारंपारिक नळ आणि प्लंबिंग प्रणालीमध्ये नावीन्यपूर्णता
    1. पाण्याचा वापर, नासाडी, रेकॉर्डिंग कार्यक्षमता दर्शविणारे स्मार्ट नळ, IOT सक्षम आणि कामगिरीचे निरीक्षण व सुधारणा करण्यासाठी त्यांना केंद्रीय डेटाबेसशी जोडले आहे

पात्रता निकष

  1. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) द्वारे स्टार्ट-अप म्हणून मान्यताप्राप्त सर्व संस्था.
  2. स्टार्ट अपद्वारे वरील विषयांमध्ये उपाय प्रदान केला गेला असला पाहिजे.

चॅलेंजमध्ये भाग कसा घ्यायचा

  1. इंडिया वॉटर पीच-पायलट-स्केल स्टार्ट-अप चॅलेंज मध्ये अर्ज करण्यासाठी येथे जा innovateindia.mygov.in
  2. सहभागी कोणत्याही वैध ईमेल-ID चा वापर करून या चॅलेंजसाठी नोंदणी करू शकतात. अर्जदाराने नोंदणीसाठी विनंती केली की, नोंदणीकृत ईमेल-ID वर त्यांची नोंदणी स्वीकारून सहभाग होण्यासाठी आवश्यक प्रक्रियेचे तपशील प्रदान करणारा ईमेल पाठविला जाईल.
  3. 3.नोंदणीकृत अर्जदार 'सहभागी व्हा' बटणावर प्रेस करून त्यांचा प्रस्ताव अपलोड करू शकतात.

मूल्यमापन प्रक्रिया आणि निकष

सादर केलेल्या प्रस्तावांचे मूल्यमापन करून त्यांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी दोन चरणांची तपासणी प्रक्रिया केली जाईल. स्क्रीनिंग कमिटी प्रारंभिक शॉर्टलिस्टिंग करेल. त्यानंतर अंतिम निवडीसाठी तज्ज्ञ समितीकडून शॉर्टलिस्ट केलेल्या प्रस्तावांची छाननी केली जाईल. समित्या खालील व्यापक निकषांच्या आधारे प्रस्तावांचे मूल्यमापन करतीलः

  1. नावीन्यपूर्णता
  2. उपयुक्तता
  3. विषयाशी कितपत संबंधित आहे
  4. समाजावर होणारा परिणाम, म्हणजेच शहरांमधील पाणीविषयक गंभीर आव्हाने सोडविण्यासाठी किती उपयुक्त ठरेल
  5. प्रतिकृतीक्षमता
  6. स्केलेबिलिटी
  7. उपयोजन / रोल-आऊटची सुलभता
  8. उपायाच्या अंमलबजावणीमधील संभाव्य जोखीम
  9. प्रस्तावाची पूर्तता

महत्त्वाच्या तारखा

प्रारंभ तारीख 21 नोव्हेंबर 2023
समाप्ती तारीख 20 नोव्हेंबर 2024

निधी आणि इतर समर्थन

  1. इंडिया वॉटर पीच-पायलट-स्केल स्टार्टअप चॅलेंजमधील निवडक स्टार्टअप्सना 5 लाख, 7 लाख आणि 8 लाख रुपये अशा टप्प्याने कमाल 20 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकल्पित प्रस्तावानुसार कामाच्या काही अटी / महत्वपूर्ण टप्पे पूर्ण केल्यानंतर त्यांना हे अनुदान देण्यात येईल.
  2. निवडक स्टार्ट अप्सना मार्गदर्शनाची सुविधा दिली जाईल.
  3. MoHUA उद्योग आणि शहरी स्थानिक संस्थांच्या भागीदारीतून उपायांची व्याप्ती वाढवण्यास मदत करेल.
  4. अपेक्षित परिणाम साध्य करणाऱ्या स्टार्ट-अप्सना व्यापक प्रमाणात ओळखले जावे यासाठी त्यांचा प्रचार केला जाईल.
  5. मंत्रालयाकडून प्रशस्तीपत्र.

अटी आणि शर्ती

  1. या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व स्पर्धकांनी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे
  2. दिलेला निधी उपायांच्या विकासासाठी / वाढीसाठी आणि पसंतीच्या शहरासह प्रायोगिक तत्त्वावर कार्य सुरू करण्यासाठी वापरला गेला पाहिजे. सहभागींना प्रत्येक महत्वाचा टप्पा गाठल्यावर निधी वापर प्रमाणपत्र प्रदान करणे आवश्यक आहे.
  3. चॅलेंजचा भाग म्हणून विकसित केलेले उपाय / उत्पादन विजेत्यांकडे राहतील. मात्र विजेत्याला या स्पर्धेदरम्यान आणि पुरस्कार जिंकल्यानंतरच्या निश्चित केलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करावे लागेल.
  4. कोणी या अटींचे पालन करत नाही असे आढळल्यास त्यांचा सहभाग रद्द केला जाऊ शकतो.
  5. कोणत्याही वादाच्या निवारणासाठी MoHUA चा निर्णय या प्रकरणाच्या बाबतीत अंतिम ठरेल.

पत्रव्यवहार

सहभागींनी अर्ज भरताना दिलेल्या ईमेल सर्व पत्रव्यवहार केला जाईल. ईमेल वितरण अयशस्वी झाल्यास आयोजक जबाबदार नसतील.

अस्वीकरण

MoHUA ने आपल्या विवेकबुद्धीने, पूर्वसूचना न देता, ही स्पर्धा रद्द करण्याचे, समाप्त करण्याचे, निलंबित करण्याचे आणि स्पर्धेशी संबंधित नियम, बक्षिसे आणि निधीमध्ये बदल करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत. कोणत्याही परिस्थितीत MoHUA/मायगव्ह/NIC किंवा इतर कोणतेही आयोजक कोणत्याही दाव्यासाठी, हानीसाठी, खर्चासाठी किंवा नुकसानासाठी जबाबदार राहणार नाहीत.

या चॅलेंजसंबंधी अधिक माहितीसाठी तुमचे प्रश्नांची इथे पाठवा Startup[dash]amrut2[at]asci[dot]org[dot]in आणि Usamrut2a[at]gmail[dot]com