इंडियन स्वच्छता लीग

"लीग" म्हणजे काय

इंडियन स्वच्छता लीग ही स्वच्छ भारत मिशन-शहर 2.0 अंतर्गत कचरामुक्त शहरांच्या उभारणीच्या दिशेने युवकांच्या नेतृत्वाखालील भारतातील पहिली आंतर-शहर स्पर्धा आहे. 2022 मध्ये, देशभरातील 5,00,000+ पेक्षा जास्त युवा विद्यार्थी, नागरिक स्वयंसेवक, युवा नेते आणि सेलिब्रिटी आयकॉन्स ISL च्या पहिल्या आवृत्तीत सहभागी झाले आणि 17 सप्टेंबर 2022 रोजी, सेवा दिवसाच्या निमित्ताने शहर स्वच्छ आणि कचरा मुक्त करण्यासाठी त्यांनी योगदान दिले.

शहरातील 1,800+ हून अधिक संघांनी विविध सर्जनशील आणि आगळेवेगळे उपक्रम राबवून स्वच्छतेविषयी आपली आवड दर्शवली. शहरातील संघांनी सायकल रॅली आयोजित केल्या आणि तरुणांसोबत एकत्र मिळून समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली व अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्रोताच्या ठिकाणी कचरा वेगळा करण्याचा संदेश दिला. लाखो युवकांनी टेकड्या स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्याची विनंती केली आणि सर्व थंड हवेच्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात धावता-धावता कचरा उचलण्याची आणि स्वच्छतेची मोहीम राबवली.

स्पर्धा

स्वच्छ भारत अभियानाची नऊ वर्षे आणि SBM-U 2.0 ची दोन वर्षे साजरी करण्यासाठी, स्वच्छता हीच सेवा हा पंधरवडा 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. इंडियन स्वच्छता लीगची दुसरी आवृत्ती या पंधरवड्याच्या सुरुवातीला 17 सप्टेंबर 2023 रोजी सेवा दिनापासून होणार आहे.

ISL 2.0 चा एक भाग म्हणून, 4,000+ पेक्षा जास्त शहरांमधील टीम कचरा मुक्त समुद्रकिनारे, टेकड्या आणि पर्यटन स्थळांसाठी रॅली काढतील.

ISL 2.0 पूर्ण झाल्यानंतर, शहरातील प्रत्येक संघ त्यांच्या उपक्रमांसंबंधी फोटो आणि व्हिडिओसह अधिकृत प्रवेशिका सादर करतील. खालील निकषांच्या आधारे शहरातील संघांचे मूल्यमापन केले जाईल

  • मायगव्हवरील स्वयंसेवक नोंदणीद्वारे युवकांच्या सहभागाचे प्रमाण
  • उपक्रमांची कल्पकता
  • उपक्रमांचा प्रभाव

मूल्यांकन केल्यानंतर, देशभरातील सर्वोत्तम शहर टीमला ISL चॅम्पियन घोषित करण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2023 च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी विजेत्या संघांच्या कॅप्टन आणि इतर प्रतिनिधींना आमंत्रित केले जाईल.

लक्षात घेण्यासारखे मुद्दे

नोंदणी प्रारंभ तारीख: 13 सप्टेंबर 2023.

कृपया आपल्या शहरासाठी फॉर्म भरताना प्रदान केलेली सर्व स्थाने, वेळ आणि संपर्क माहिती काळजीपूर्वक लक्षात ठेवा.

आणि विसरू नका

अधिकृत हॅशटॅग आहेत #IndianSwachhataLeague आणि #YouthVsGarbage.

आपल्या शहरातील समुद्रकिनारे, टेकड्या आणि पर्यटन स्थळे कचरामुक्त करण्यासाठी रॅली काढाल तेव्हा 17 सप्टेंबर रोजी @SwachhBharatGov आणि @MOHUA_India टॅग करा.

सर्वात अद्वितीय नागरिक उपक्रम आणि पोस्ट राष्ट्रीय मिशन पेजवर प्रदर्शित केले जातील!