दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन जगभरात साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) नेसुरू केलेल्या या दिवसाचे उद्दिष्ट आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर तंबाखूच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी आणि तंबाखूमुक्त समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यक्ती, समुदाय आणि सरकारांना सामूहिक कृती करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हे एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करते.
हा दिवस सध्याच्या आणि भावी पिढ्यांना तंबाखू सेवनाच्या धोक्यांपासून, ज्यामध्ये धूम्रपान आणि धूरविरहित दोन्ही प्रकारांचा समावेश आहे, संरक्षण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करतो. हा दिवस सार्वजनिक आरोग्याप्रती असलेल्या वचनबद्धतेला बळकटी देतो आणि प्रतिबंधात्मक उपाय, वर्तन बदल आणि आरोग्य संवर्धनाद्वारे असंसर्गजन्य रोगांचा भार कमी करण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांना समर्थन देतो.
जागतिक तंबाखू विरोधी दिन हा तरुणांना शिक्षित करण्याची, भागधारकांना सहभागी करून घेण्याची आणि सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (COTPA), 2003,, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP), आणि WHO फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन टोबॅको कंट्रोल (WHO FCTC) यांच्या अनुषंगाने तंबाखू नियंत्रण कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी मजबूत करण्याची संधी आहे..
31 मे 2025 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (DoSEL), देशभरातील सर्व शाळांनातंबाखूच्या वापराच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आयोजित राष्ट्रव्यापी शालेय चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आव्हानात चार साधने/उपक्रम समाविष्ट आहेत; रॅली, नुक्कड नाटक, पोस्टर्स आणि घोषणा/कविता ज्याचा वापर शाळांद्वारे स्थानिक समुदायांना तंबाखूच्या वापराविरुद्ध एकत्रित येण्यासाठी केला जाऊ शकतो.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, संदेशाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त सहभागासह शाळा रॅली, नुक्कड नाटक, पोस्टर बनवणे आणि घोषणा/कविता लेखन स्पर्धा आयोजित करतीलः तंबाखूला नाही, आरोग्याला हो म्हणा. विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त पिढी साध्य करण्यासाठी बदलाचे प्रतिनिधी आणि उत्प्रेरक बनवणे हे उद्दिष्ट असेल. हे चार साधने/उपक्रम विद्यार्थ्यांना जनतेशी संवाद साधण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि निरोगी, तंबाखूमुक्त जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करतील.
जागतिक तंबाखू निषेध दिन 2025 पाळण्याचा एक भाग म्हणून "राष्ट्रव्यापी स्कूल चॅलेंज". 31 जुलै 2025 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थी आणि समुदायामध्ये तंबाखूच्या वापराच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि मुलांना निरोगी समाज निर्माण करण्यासाठी बदलाचे प्रतिनिधी बनण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.
तंबाखू हा सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे, जो दरवर्षी असंख्य लोकांचा बळी घेतो आणि देशभरातील कुटुंबे आणि समुदायांवर परिणाम करतो. या चॅलेंजमुळे शाळांना आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शेजारच्या आणि आजूबाजूच्या भागात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याची संधी मिळतेः तंबाखूला नाही, आरोग्याला हो म्हणा.
चॅलेंजमध्ये भाग घेणाऱ्या शाळा हे सुनिश्चित करू शकतात की जास्तीत जास्त विद्यार्थी चार उपक्रमांमध्ये सहभागी होतील आणि त्यांना सर्जनशील आणि अर्थपूर्णपणे त्यांचे मत व्यक्त करण्यास प्रोत्साहित केले जाईल. विद्यार्थी प्रभावी पोस्टर तयार करू शकतात, विचारप्रेरक घोषणा आणि कविता लिहू शकतात, नुक्कड नाटक (पथनाट्ये) सादर करू शकतात आणि संदेशाच्या जास्तीत जास्त विस्तारासाठी रॅलीद्वारे स्थानिक समुदायांशी संवाद साधू शकतात. हे सर्जनशील प्रयत्न जनतेला गुंतवून ठेवण्यासाठी, जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तंबाखूच्या वापराविरूद्ध सामूहिक कृतीला प्रेरणा देण्यासाठी शक्तिशाली साधने म्हणून काम करतील.
सर्व सहभागी शाळांनी शाळेसाठी एक नोडल व्यक्ती (मुख्याध्यापक, शिक्षक किंवा प्रशासकीय कर्मचारी) निश्चित करावी. स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी नोडल व्यक्तीने मायगव्ह इनोव्हेट प्लॅटफॉर्मवर शाळेची नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक सहभागी शाळेने त्यांचे सबमिशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी खाली नमूद केलेल्या चित्र किंवा व्हिडिओची लिंक सबमिट करावी लागेल.
रॅलीसाठी आवश्यक महत्वाची माहितीः
i. एकूण क्रमवारीत चार उपक्रमांचे खालील महत्त्व असेलः
उपक्रम |
वेटेज |
रॅली |
40 % |
पोस्टर |
20 % |
स्लोगन/कविता |
20 % |
नुक्कड नाटक |
20 % |
एकूण स्कोअर |
100 गुण |
ii. रॅलीच्या मूल्यांकनात 3 स्तर असतील: जिल्हा/राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तर आणि राष्ट्रीय स्तर.
जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील ज्युरी पॅनेलने केलेल्या शिफारशींच्या आधारे सर्वात उत्कृष्ट शाळांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान केला जाईल. या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना पदके आणि प्रशंसा प्रमाणपत्रे दिली जातील. ही शाळा PM ई-विद्या चॅनेलवर देखील प्रदर्शित केली जाईल.
टेबल 1: राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय प्रवेशिका (शाळांच्या संख्येनुसार) राष्ट्रीय स्तरावर पाठवल्या जातील.
राज्यस्तरीय प्रवेशिका |
शाळांची संख्या |
राज्ये |
6 |
14,999 आणि त्यापेक्षा कमी |
|
8 |
15,000 24,999 शाळा |
हिमाचल प्रदेश (17,826), हरियाणा (23,517), उत्तराखंड (22,551) |
10 |
25,000 44,999 शाळा |
पंजाब (27,404), जम्मू आणि काश्मीर (24,296), झारखंड (44,475) |
12 |
45,000 59,999 शाळा |
आसाम (56,630), छत्तीसगड (56,615), गुजरात (53,626) आणि तेलंगणा (42,901) |
14 |
60,000 74,999 शाळा |
ओडिसा (61,693) आणि आंध्र प्रदेश (61,373) |
16 |
75,000 99,999 शाळा |
कर्नाटक (75,869), पश्चिम बंगाल (93,945) आणि बिहार (94,686) |
18 |
1,00,000 1,23,411 शाळा |
महाराष्ट्र (1,08,237) आणि राजस्थान (1,07,757) |
20 |
1,23,411 पेक्षा अधिक शाळा |
मध्य प्रदेश (1,23,412) आणि उत्तर प्रदेश (2,55,087) |
स्त्रोत: UDISE+ 2023-24