या स्पर्धेबद्दल
How to participate? Watch Video
नागरिकांच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये इंटरनेटने आणलेल्या परिवर्तनावर विविध सशक्त वास्तविक जीवनातील कथांची देवाणघेवाण करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी दळणवळण मंत्रालयाने भारत इंटरनेट उत्सव हा उपक्रम राबविला आहे. मोबाईल कनेक्टिव्हिटी, फायबर टू द होम, फायबर टू द बिझनेस, PM वाय-फाय अॅक्सेस नेटवर्क इनिशिएटिव्ह (PM-WANI) आणि इतर उपक्रमांनी विशेषतः ग्रामीण भागात आणि कोविड दरम्यान जीवन सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. UPI, DBT, COWIN, Digi Locker यासारखी क्रांतिकारी साधने वापरणे डिजिटल पायाभूत सुविधांमुळे शक्य झाले आहे.
या उत्सव अभियानाअंतर्गत देशभरात विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेटच्या क्रांतीचे वैशिष्ट्य शेअर करण्याचे कार्य मंत्रालय स्वीकारत आहे. वास्तविक जीवन कथा ज्या त्यांचे भौगोलिक स्थान कोणतेही असले तरी डिजिटल अंतर भरुन काढण्यात लक्षणीय प्रगती दर्शवत आहेत. यासाठी #BharatIntenetUtsav हा व्यापक उपक्रम आहे.
मायगव्ह दूरसंचार मंत्रालयाच्या सहकार्याने 'भारत इंटरनेट उत्सव- इंटरनेटची शक्ती साजरी करा' च्या माध्यमातून या परिवर्तनाचे दर्शन घडवणारे व्हिडिओ मागवत आहेत. हे परिवर्तन सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी असू शकते.
तांत्रिक मापदंड
- व्हिडिओ प्रारंभ आणि अंतिम क्रेडिट मिळून 2 मिनिटे (120 सेकंद) पेक्षा जास्त नसावा. या वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त चित्रपट / व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत.
- क्रेडिटसह याची किमान लांबी 30 सेकंद असावी.
- टाइम-लेप्स / नॉर्मल मोडमध्ये रंग आणि मोनोक्रोम या दोन्ही प्रकारचे व्हिडिओ स्वीकारले जातील.
- कृपया खात्री करा की चित्रपट / व्हिडिओ चांगल्या प्रतीचे कॅमेरा / मोबाइल फोनमध्ये शूट केले गेले आहेत आणि आडव्या किंवा उभ्या स्वरुपात / रील / शॉर्ट्स स्वरूपात 16:9 प्रमाणामध्ये आहेत
वेळ
सुरुवातीची तारीख | 7 जुलै, 2023 |
शेवटची तारीख | 21 ऑगस्ट, 2023 |
बक्षिसे
3 सर्वोत्तम विजेत्यांना पुरस्कृत केले जाईलः
प्रथम पारितोषिक: 15000/- रु.
दुसरे पारितोषिक: 10,000/- रु.
तिसरे पारितोषिक: 5,000 रु.
नियम आणि अटी
- ही स्पर्धा 14 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.
- सहभागींनी त्यांचा मायगव्ह प्रोफाइल अचूक आणि अपडेट केलेला आहे याची खात्री करून घ्यावी कारण या प्रोफाइलचा वापर पुढील संप्रेषणासाठी केला जाईल. यामध्ये नाव, फोटो, पूर्ण पोस्टल पत्ता, ईमेल ID, आणि फोन नंबर, राज्य यांसारख्या तपशीलांचा समावेश आहे. अपूर्ण प्रोफाइल असलेल्या प्रवेशिका विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- एकदा सादर केलेल्या प्रवेशिका, कॉपीराइट पूर्णपणे दळणवळण मंत्रालयाकडे असतील. विभाग स्वत:च्या वापरासाठी या व्हिडीओचा वापर करेल.
- या सर्व प्रवेशिका केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाची बौद्धिक संपदा असतील. सहभागींनी कोणत्याही अधिकाराचा वापर करू नये किंवा भविष्यातील कधीही त्यावर दावा करू नये.
- विजेते म्हणून निवडल्यास स्पर्धकांकडे ओळखीचे पुरावे मागितले जातील.
- सहभागी जास्तीत जास्त 2 मिनिटांच्या क्लावाधीचा व्हिडिओ पोस्ट करू शकतात.
- एक स्पर्धक या विषयाशी संबंधित अनेक प्रवेशिका सादर करू शकतो.
- स्पर्धा विषयातील आपल्या प्रवेशिकेची प्रासंगिकता, व्हिडिओद्वारे व्यक्त केलेली सर्जनशीलता आणि प्रवेशिकेची प्रेरणा यावर आधारित प्रवेशिकेची निवड केली जाईल.
- कोणताही अनुचित/अश्लील व्हिडिओ सध्याच्या कायदेशीर नियमांनुसार हाताळला जाईल.
- प्रवेशिकेत कोणताही उत्तेजक, आक्षेपार्ह, किंवा अयोग्य आशय नसावा.
- सहभागी आणि प्रोफाइल मालक समान असावे. हे समान नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरेल.
- सादर केलेली प्रवेशिका मूळ कार्य असणे आवश्यक आहे आणि कॉपी केलेल्या प्रवेशिका किंवा चोरी केलेल्या प्रवेशिका या स्पर्धेअंतर्गत विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही तृतीय पक्षाच्या बौद्धिक मालमत्ता अधिकारांचे उल्लंघन करणारी असू नये.
- आयोजक कोणत्याही वेळी स्पर्धा / मार्गदर्शक तत्त्वे / मूल्यांकन निकष इ. चा सर्व किंवा कोणत्याही भाग रद्द किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार राखून ठेवतो.
- शॉर्ट व्हिडिओ सबमिशन्सचा वापर भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाद्वारे जाहिरात / किंवा प्रदर्शन हेतूने, माहिती, शिक्षण आणि संप्रेषण सामग्रीसाठी आणि त्यांना योग्य वाटेल अशा इतर कोणत्याही वापरासाठी केला जाऊ शकतो
- भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाला प्रवेशिका / व्हिडिओंवर पूर्ण अधिकार आणि नियंत्रण असेल ज्यात सार्वजनिक वापरासाठी त्याचा वापर समाविष्ट असेल.
- प्रवेशिका सादर केल्यानंतर, स्पर्धक नमूद केलेल्या या अटी आणि शर्तींशी बांधील असल्याचे स्वीकार आणि मान्य करतात.
- मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता न झाल्यास सहभागींना अपात्र ठरविण्यात येईल.