2021 मध्ये शौर्य पुरस्कार पोर्टल (GAP) अंतर्गत प्रकल्प वीर गाथा सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पाचा उद्देश शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्याची तपशीलवार माहिती आणि या शूरवीरांच्या जीवनकथा विद्यार्थ्यांमध्ये पसरवणे, जेणेकरून देशभक्तीची भावना निर्माण होईल आणि त्यांच्यामध्ये नागरी जाणीवेची मूल्ये रुजवता येतील. प्रकल्प वीर गाथाने शालेय विद्यार्थ्यांना (भारतातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना) शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित सर्जनशील प्रकल्प/कार्यक्रम करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करून हे उदात्त उद्दिष्ट अधिक दृढ केले.