G-20 निबंध स्पर्धा

बद्दल

1 डिसेंबर 2022 रोजी भारताने इंडोनेशियाकडून G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले होते. लोकशाही आणि बहुपक्षवादाप्रती समर्पित असलेल्या भारतासाठी G20 चे अध्यक्षपद हा त्याच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण असेल कारण सर्वांच्या कल्याणासाठी व्यावहारिक जागतिक उपाय शोधण्यात G-20 चे अध्यक्षपद महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे आणि सोबतच, वसुधैव कुटुंबकम किंवा संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे या मागील खरी भावना प्रकट करेल.

G-20 ला भारतीय जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना सहभागी आणि कृतीशील बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उल्लेखनीय उपक्रमांचा एक भाग म्हणून, G-20 सचिवालय / परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, मायगव्हच्या सहकार्याने पुढील विषयावर आधारित निबंध स्पर्धा आयोजित करत आहे भारताच्या G-20 अध्यक्षपदासाठी माझे व्हिजन. भारतीय युवकांच्या कल्पक विचारांना आणि अंतर्दृष्टीपूर्ण दृष्टीकोनांना विचारात घेऊन, G-20 देशांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने नेण्यात भारताच्या प्रमुख भूमिकेबाबत धोरणात्मकदृष्ट्या जागृती निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.

निबंध स्पर्धेची मुख्य उद्दिष्टे :

 1. भारताच्या G-20 अध्यक्षपदासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना आणि दूरदृष्टी मांडण्यासाठी आमंत्रित करणे
 2. भारताच्या G-20 अध्यक्षपदाबाबत जनजागृती करणे आणि ज्ञान वाढवणे
 3. भारताच्या G-20 अध्यक्षपदाबाबत समज वाढवणे
 4. G-20 च्या विविध निकषांमध्ये सामील होण्यासाठी तरुण भारतीयांना प्रोत्साहन देणे.

निवडीचे निकष

 • स्वतःचे मूळ विचार आणि ज्ञानाची खोली
 • सामग्रीची गुणवत्ता, विषयाशी संबंधित असणे.
 • रचना, कथन आणि लेखन शैली

लक्षात ठेवण्याचे मुद्दे

 • ही स्पर्धा केवळ भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.
 • निबंध खालील श्रेणी / वयोगटातील व्यक्तींद्वारे हिंदी किंवा इंग्रजी भाषांमध्ये सादर केला जाऊ शकतोः
श्रेणी अ 12 - 14 वर्षे
श्रेणी ब 14 -16 वर्षे
 • निबंधाची लांबी 1500 शब्दांपेक्षा जास्त नसावी.
 • निबंध इंग्रजीसाठी Arial फॉन्ट आणि हिंदीसाठी Mangal फॉन्ट वापरून 12 साईज आणि 1.5 चे स्पेस ठेवून A-4 आकाराच्या MS word डॉक्युमेंटमध्ये टाईप केला पाहिजे आणि PDF स्वरूपात सादर केला पाहिजे.
 • सहभागींनी स्वतः हे निबंध लिहिले असले पाहिजेत. निबंधात मूळ विचार आणि सादरीकरण दिसून आले पाहिजे.

वेळ

सुरुवातीची तारीख 1 जून 2023
शेवटची तारीख 31 जुलै 2023

बक्षिसे

सर्वोत्कृष्ट प्रवेशिकांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

अटी आणि शर्ती

 1. ही स्पर्धा केवळ भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.
 2. निबंध खालील श्रेणी / वयोगटातील व्यक्तींद्वारे हिंदी किंवा इंग्रजी भाषांमध्ये सादर केला जाऊ शकतोः
  1. श्रेणी: 12 - 14 वर्षे
  2. श्रेणी: 14 -16 वर्षे
 3. सर्व प्रवेशिका MyGov.in पोर्टलद्वारेच सादर केल्या पाहिजेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे/ मोड द्वारे सादर केलेल्या प्रवेशिका मूल्यमापनासाठी विचारात घेतल्या जाणार नाहीत.
 4. निबंधाची लांबी 1500 शब्दांपेक्षा जास्त नसावी.
 5. एक सहभागी फक्त एकदा सादर करू शकता. कोणत्याही सहभागीने एकापेक्षा अधिक नोंदी सादर केल्या असल्याचे आढळल्यास त्याच्या सर्व नोंदी अवैध मानल्या जातील.
 6. प्रवेशिका मूळ स्वरुपाची असावी. स्पर्धेसाठी कॉपी केलेल्या प्रवेशिकांचा किंवा चोरी केलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही. G-20 सचिवालय/परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून विजेत्या प्रवेशिकांचा योग्य प्रचारही केला जाईल.
 7. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क / नोंदणी शुल्क नाही.
 8. निबंध इंग्रजीसाठी Arial फॉन्ट आणि हिंदीसाठी Mangal फॉन्ट वापरून 12 साईज आणि 1.5 चे स्पेस ठेवून A-4 आकाराच्या MS word डॉक्युमेंटमध्ये टाईप केला पाहिजे आणि PDF स्वरूपात सादर केला पाहिजे.
 9. सहभागींनी स्वतः हे निबंध लिहिले असले पाहिजेत. निबंधात मूळ विचार आणि सादरीकरण दिसून आले पाहिजे.
 10. कृपया लक्षात घ्या की निबंध मूळ लेखन असणे आवश्यक आहे आणि भारतीय कॉपीराइट अधिनियम 1957 च्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करणारा असू नये. इतरांच्या कॉपीराईटचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्धेतून अपात्र ठरवले जाईल. G -20 सचिवालय / परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सहभागींनी केलेल्या कॉपीराइट उल्लंघन किंवा बौद्धिक मालमत्तेच्या उल्लंघनाची कोणतीही जबाबदारी घेत नाही.
 11. निबंधाच्या कोणत्याही भागात लेखकाचे नाव / ई-मेल इत्यादींचा उल्लेख असल्यास प्रवेशिका अपात्र ठरेल.
 12. G -20 सचिवालय / परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पुरस्कार देण्यापूर्वी मूळ कागदपत्रे जसे की वयाचा पुरावा इत्यादी सत्यापित करण्याचा अधिकार राखून ठेवते.
 13. G-20 सचिवालय/परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिक संवाद साधण्यासाठी मायगव्ह प्रोफाईलचा वापर केला जात असल्याने स्पर्धकांनी त्यांचे मायगव्ह प्रोफाईल अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, फोटो, पूर्ण पोस्टल पत्ता, ईमेल आयडी आणि फोन नंबर यांसारख्या तपशीलांचा समावेश आहे. अपूर्ण प्रोफाइल असलेल्या प्रवेशिका विचारात घेतल्या जाणार नाहीत.
 14. G -20 सचिवालय / परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सर्व अधिकार राखून ठेवतात आणि या स्पर्धा / मार्गदर्शक तत्त्वे / मूल्यमापन निकष संबंधित कोणतेही वाद, दुरुस्ती किंवा समस्या इ. यांच्या बाबतीत G-20 सचिवालय/परराष्ट्र व्यवहार मंत्रालय जो निर्णय घेईल तो अंतिम आणि बंधनकारक असेल.
 15. G -20 सचिवालय / परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कोणत्याही वेळी स्पर्धा / मार्गदर्शक तत्त्वे / मूल्यांकन निकष इत्यादीच्या सर्व किंवा कोणत्याही भागास रद्द करण्याचा किंवा सुधारित करण्याचा अधिकार राखून ठेवते.
 16. अटी आणि शर्ती / तांत्रिक मापदंड / मूल्यमापन निकषांमध्ये कोणतेही बदल, किंवा स्पर्धा रद्द केल्याबाबत सूचना, मायगव्ह प्लॅटफॉर्मवर अद्यतनित / पोस्ट केल्या जातील. या स्पर्धेसाठी नमूद केलेल्या मुदत आणि अटी / तांत्रिक मापदंड / मूल्यमापन निकषातील कोणत्याही बदलांबद्दल माहिती मिळवण्याची जबाबदारी सहभागींची स्वतःची असेल.
 17. कोणतीही प्रवेशिका मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळल्यास, सहभागीला कोणतीही माहिती किंवा स्पष्टीकरण न देता ती मूल्यमापन प्रक्रियेतून काढून टाकण्यात येईल.
 18. पडताळणीसाठी G-20 सचिवालय / विदेश मंत्रालयाकडून स्पर्धा प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी मूळ कागदपत्रे विचारली जाऊ शकतात.
 19. G-20 सचिवालय/परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे स्पर्धा प्रवेशिका कॉपी, साठवण, संपादित, वितरित, प्रसारित आणि प्रकाशित करण्यासाठी विशेष, रॉयल्टी-मुक्त, शाश्वत आणि अपरिवर्तनीय परवाना असेल.
 20. मूल्यमापन समितीचा निर्णय अंतिम आणि सर्व सहभागींना बंधनकारक असेल.
 21. मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता न झाल्यास सहभागींना अपात्र ठरविण्यात येईल.