ऑनलाईन हॅकेथॉन ऑन डेटा-ड्रिव्हन ओनोव्हेशन फॉर सिटीझन ग्रीव्हन्स रिड्रेसल - 2024

बद्दल

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (DARPG) ने आयोजित केलेल्या नागरिक तक्रार निवारणासाठी डेटा-आधारित नवीन उपक्रम या ऑनलाईन हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत.

DARPG सहभागींना डेटा-आधारित उपायांचा वापर करून नागरिक तक्रार निवारणाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी आमंत्रित करत आहे. हॅकेथॉन सहभागी संघांसाठी नागरिकांनी सादर केलेल्या तक्रार अहवालांचा अनामिक, संकलित आणि संरचित डेटा उपलब्ध करून देईल, ज्यांचे विश्लेषण, अभ्यास आणि वापर करून सहभागी संघ असे विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपाय विकसित करतील जे DARPG द्वारे आवश्यकतेनुसार स्वीकारले जातील आणि अंमलात आणले जातील.

सहभागी संघ आयोजकाने परिभाषित केलेल्या एक किंवा अनेक समस्यांर काम करू शकतात आणि प्रत्येक समस्येसाठी निर्दिष्ट केल्यानुसार नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा सादर करू शकतात. या उत्पादने आणि सेवांमध्ये विविध भारतीय भाषांमधील संवाद लिखित स्वरुपात करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करणे, चॅटबॉट्स किंवा टॉपिक क्लस्टरिंग यासारख्या विविध हेतूंसाठी AI/ML मॉडेल्सचा विकास करणे, तक्रार वर्गीकरण आणि देखरेखीसाठी यंत्रणा तयार करणे, तसेच DARPG द्वारे अंमलात आणलेल्या विद्यमान सॉफ्टवेअर प्रणालींसाठी UI/UX अ‍ॅडीशन आणि एन्हांसमेंट यांचा समावेश असू शकतो.

सहभाग घेण्यासाठी हे चॅलेंज खुले आहे:

प्रथम 3 सर्वात नाविन्यपूर्ण उपाययोजनांना खालील बक्षिसे दिली जातील:

 • दोन लाख रुपये सर्वात नाविन्यपूर्ण डेटा आधारित उपायासाठी;
 • एक लाख रुपये दुसऱ्या सर्वात नाविन्यपूर्ण डेटा आधारित उपायासाठी; आणि
 • पन्नास हजार रुपये तिसऱ्या सर्वात नाविन्यपूर्ण डेटा आधारित उपायासाठी.

प्रत्येक सहभागी संघात जास्तीत जास्त 5 सदस्य असू शकतात आणि या सर्वांचे किमान 18 वर्षांचे असणे आवश्यक आहे. हे सहभागी विद्यार्थी किंवा संशोधक किंवा भारतीय स्टार्टअप्स आणि कंपन्यांशी संबंधित व्यक्ती असू शकतात.

नोंदणीकृत सहभागींना निवडलेल्या समस्येवरील उपायांचा प्रोटोटाईप तयार करण्यासाठी नागरिकांच्या तक्रारींचा अनामिक केलेला डेटासेट उपलब्ध करून दिला जाईल. सर्वात नाविन्यपूर्ण आणि आशादायक प्रोटोटाईपना सार्वजनिकरित्या मान्यता दिली जाईल आणि भारत सरकारच्या नागरिक तक्रार निवारण प्रणालीचा अनुभव आणि कामगिरी सुधारण्यासाठी DARPG द्वारे पुढील विकास आणि अंमलबजावणीसाठी त्यांचा विचार केला जाईल.

सहभाग

 • ही स्पर्धा खालील लोकांसाठी खुली आहे:
  • विद्यार्थी/संशोधन करणारे अभ्यासक/व्यक्ती
  • भारतीय स्टार्ट अप्स/भारतीय कंपन्या (नोंदणीकृत कंपनीचे नाव आणि त्यांचा नोंदणी क्रमांक आवश्यक आहे)
 • सहभागी किमान 18 वर्षांचे असावेत.
 • सहभागी वैविध्यपूर्ण संघ तयार करू शकतात, ज्यात विविध कौशल्ये असलेल्या लोकांचा समावेश असेल आणि संघाच्या प्रमुखासह जास्तीत जास्त पाच सदस्यांचा समावेश असेल.
 • संघामध्ये संघ प्रमुखासह किमान एक सदस्य असला पाहिजे.
 • NIC आणि DARPG चे कर्मचारी आणि नातेवाईकांना या हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

नोंदणी

 • सर्व सहभागींनी जनपरीचय येथे नोंदणी करणे आवश्यक आहेः लिंक. नोंदणीकृत वापरकर्ता थेट येथे लॉगिन करू शकतात https://event.data.gov.in आणि हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक तपशील सादर करू शकतात. सहभागींनी अचूक आणि अद्ययावत तपशील सादर करणे अपेक्षित आहे आणि सादर करण्यापूर्वी त्यांनि या तपशिलांची पुष्टी केली पाहिजे.
 • संघप्रमुख आणि संघातील प्रत्येक सदस्य केवळ एकाच संघाचा भाग असू शकतात. संघातील कोणताही एक सदस्य सहभाग घेण्यासाठी संघ तयार करू शकतो.

ऑनलाईन हॅकेथॉनची रचना

 • हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित केला जाईल.
 • विद्यार्थी, संशोधन करणारे अभ्यासक, व्यक्ती, भारतीय स्टार्ट अप्स आणि भारतीय कंपन्यांसाठी सहभाग खुला असेल.
 • हॅकेथॉनच्या शुभारंभापासून नोंदणी करण्यासाठी आणि उपायांचा प्रोटोटाईप सादर करण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी असेल.
 • इच्छुक उमेदवार यामध्ये नोंदणी आणि सादर करण्यासाठी पुढील लिंकवर जातील: https://event.data.gov.in.
 • हॅकेथॉनमध्ये नोंदणी करणाऱ्या सहभागींना DARPG 1 जानेवारी 2023 पासून नागरिकांच्या तक्रारींचे डेटासेट (अनामिक आणि हॅश केलेले) प्रदान करेल आणि चॅलेंजदरम्यान या डेटासेटचा वापर https:// event.data.gov.in/challenge/darpg-challenge-2024 येथून करता येईल.
 • उपायाचे प्रोटोटाईप सादर करण्यापूर्वी, सहभागींना त्यांचे कोड GIT (https://www.github.com) रिपॉझिटरीवर अपलोड करावे लागतील आणि YouTube वर पर्यायी डेमो/उत्पादन व्हिडिओ अपलोड करावा लागेल.
 • ऑनलाईन सादरीकरणांसाठी, DARPG द्वारे मूल्यांकनासाठी खालील बाबी सामायिक कराव्या लागतील:
  • सोल्युशन सोर्स कोड रिपॉझिटरी प्रॉडक्ट डेमो/फिचरसाठी लिंक
  • व्हिडिओची लिंक (पर्यायी)
  • प्रकल्पाचे सादरीकरण PDF मध्ये
  • प्रकल्पाची फाइल/अहवाल किंवा PDF मधील इतर दस्तऐवज (असल्यास)
  • UI/UX डिझाईन्सच्या बाबतीत SVG फाईल
 • DARPG द्वारे मान्य केलेल्या आणि अधिसूचित केलेल्या परीक्षकांमध्ये सरकार, शैक्षणिक संस्था, समुदाय, उद्योग इत्यादींमधील तज्ञांचा समावेश असेल. हे प्रख्यात परीक्षक संभाव्य उपायांच्या प्रोटोटाईपची निवड करतील. निवडण्यात आलेल्या सहभागींना पॅनेलच्या सादरीकरणासाठी बोलावले जाऊ शकते.
 • ऑनलाईन चॅलेंजमधून निवडलेल्या प्रवेशिकांना प्रमाणपत्र दिले जाईल आणि निवडण्यात आलेल्या सर्व प्रवेशिकांना प्रशंसा प्रमाणपत्र दिले जाईल. सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल जे सबमिशन पोर्टलवरून डाउनलोड करता येऊ शकेल.
 • DARPG निवडलेल्या समाधानाचे प्रोटोटाईप अधिक पुढे नेण्यासाठी पुढील नियोजन करेल आणि निवडलेल्या प्रवेशिकांचा पुढे वापर कसा करायचा या धोरणावर निर्णय घेईल.

समस्या विधान

हॅकेथॉनसाठी पाच समस्या दिल्या आहेत. चॅलेंज पृष्ठावर नोंदणीनंतर डेटासेटची लिंक उपलब्ध होईल. समस्या खालीलप्रमाणे आहेतः

समस्या 1: प्राप्त झालेल्या तक्रार अहवालांचे स्वयं-वर्गीकरण सक्षम करण्यासाठी टॉपिक क्लस्टरिंग/मॉडेलिंगसाठी AI/मल-चालित प्रणाली विकसित करा जी शेवटच्या टप्प्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी सामायिक करता येईल. प्रस्तावित उपायामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींचे अहवाल विविध नोंदणीकृत अधिकाऱ्यांशी सामायिक करण्याची यंत्रणा तसेच संबंधित अहवालांची देखरेख करण्याची/मागोवा घेण्याची यंत्रणा यांचा समावेश असू शकतो.

समस्या 2: मंत्रालयासाठी विशेष असा AI/ML-चालित चॅटबॉट विकसित करा, जो CPGRAMS पोर्टलवर (https://pgportal.gov.in) तक्रार दाखल करण्याशी संबंधित सामान्य प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांना मदत करेल आणि सुरळीतपणे तक्रारी दाखल करण्याच्या प्रक्रियेस गती देईल.

समस्या 3: नागरिकांच्या तक्रारींशी संबंधित अभिप्राय देणाऱ्या फोन कॉलचा अचूकपणे इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यासाठी विद्यमान ओपन-सोर्स स्पीच-टू-टेक्स्ट ट्रान्सस्क्रिप्शन टूलचे मूल्यांकन करा आणि त्यांना अधिक अनुकूल बनवा. या टूलच्या कामगिरीचे मापदंड ठरवणे आणि हिंदी, इंग्रजी आणि हिंग्लिशमधील कॉलच्या ट्रान्सस्क्रिप्शन अचूकतेमध्ये मोजता येण्याजोग्या सुधारणा साध्य करण्यासाठी उपायांची अंमलबजावणी करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात नवीन प्रणाली तयार केली जात नाही तर त्याऐवजी आधीच वापरात असलेल्या ओपन-सोर्स उपायांना अधिक चांगले बनवण्यावरलक्ष केंद्रित केले जाते.

समस्या 4: 1) चुकीच्या एजन्सी/अधिकाऱ्याकडे पाठवल्या जाणाऱ्या तक्रारी, 2) तक्रार करण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती/एजन्सी प्रत्येक मंत्रालयात अनेक तक्रारी दाखल करू शकते हे लक्षात घेणे आणि त्यांना क्रमवारीचा भाग केले जाणार नाही याकडे लक्ष देणे आणि 3) विविध मंत्रालये/विभाग/राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची तक्रार निवारण कामगिरी यांच्या पॅटर्नची ओळख आणि विश्लेषण करण्यासाठी विद्यमान ऑटो-राउटिंग सिस्टमच्या ग्रॅन्युलर मॉनिटरिंग, लॉगिंग आणि विश्लेषण करण्यासाठी AI/ML-चालित प्रणाली विकसित करा, जेणेकरून त्यांची परिणामकारकता आणि कार्यक्षमतेची क्रमवारी तयार केली जाऊ शकेल. प्रस्तावित उपाय डॅशबोर्डच्या स्वरूपात असू शकतो. DARPG आणि इतर संबंधित अधिकारी वेबसाईटवरून आणि मोबाइलद्वारे यावर प्रवेश करू शकतील आणि तक्रार निवारण प्रणाली आणि विविध नोंदणीकृत सरकारी एजन्सीच्या कामगिरीवर लक्ष ठेवू शकतील. विद्यमान क्रमवारी प्रणाली समजून घेण्यासाठी GRAI अहवाल सर्व सहभागींसोबत सामायिक केला जाईल.

समस्या 5: ट्री डॅशबोर्ड आणि IGMS वेबसाईटसारख्या DARPG पोर्टल/टूलचा अवलंब आणि उपयुक्तता (सरकारी संस्था/अधिकाऱ्यांद्वारे) सुधारण्यासाठी UI/UX उपाय विकसित करा.

रोख बक्षिस

विजेत्यांना पुढील बक्षिसे देण्यात येतील:

प्रथम पारितोषिक

पहिला पुरस्कार

दुसरे पारितोषिक

दुसरा पुरस्कार

तिसरे पारितोषिक

तिसरा पुरस्कार

नियम आणि अटी

या अटी आणि शर्ती नागरिक तक्रार निवारणासाठी डेटा आधारित नवीन उपक्रमांवरील ऑनलाईन हॅकेथॉनचे नियमन करतात. या कार्यक्रमात सहभागी झाल्यास, स्पर्धकाणे खाली नमूद केलेल्या अटी आणि शर्ती तसेच OGD प्लॅटफॉर्म इंडियाच्या वापराच्या अटी स्वीकारल्या आहेत असे मानले जाईल.

सामान्य अटी आणि शर्ती

कृपया ह्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा कारण त्या हॅकेथॉनसाठी लागू होतात. हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आणि शॉर्टलिस्टमध्ये निवडण्यात आलेले किंवा विजेते म्हणून घोषित करण्यासाठी पात्र होण्यासाठी, सहभागींनी या अटी आणि शर्ती स्वीकारल्या पाहिजेत.

 • सहभागी संघ आयोजकाने परिभाषित केलेल्या एक किंवा अनेक समस्यांवर उपाय शोधू शकतात आणि प्रत्येक समस्येसाठी निर्दिष्ट केल्यानुसार नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा सादर करू शकतात.
 • नोंदणी करताना आणि संघ निर्मिती प्रक्रियेदरम्यान सहभागींनी कोणतीही खोटी माहिती देऊ नये.
 • सहभागींनी त्यांची संपर्क माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवली पाहिजे.
 • एखाद्या व्यक्तीसाठी किंवा संघासाठी केवळ एकच मायगव्ह/जनपरीचय/OGD खात्याला परवानगी आहे. जर एकाच उमेदवाराची एकापेक्षा जास्त खाती असतील तर तो उमेदवाराच्या आपोआप अपात्र ठरवला जाईल.
 • सादर करण्याचा एक भाग म्हणून, सादर करताना अपलोड केलेल्या कागदपत्रांमध्ये तपशीलवार माहिती दिल्याप्रमाणे/वर्णन केल्याप्रमाणे स्पर्धक अर्जाची मौलिकता आणि मालकी प्रमाणित करतील.
 • सहभागींनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याचे/तिचे/त्यांचे काम या पूर्वी प्रकाशित किंवा पुरस्कृत केले गेलेले नाही.
 • जर सहभागी त्यांच्या रोजगाराच्या कक्षेत, दुसऱ्या पक्षाचे कर्मचारी, कंत्राटदार किंवा प्रतिनिधी म्हणून काम करत असतील, तर सहभागी याची हमी देतील की अशा पक्षाला सहभागींच्या या कृतींची पूर्ण माहिती आहे आणि संभाव्यपणे त्याने बक्षीस/प्रमाणपत्र प्राप्त करण्यासह यामध्ये सहभागी होण्यासाठी संमती दिली आहे. सहभागी ही देखील हमी देतील की त्यांच्या कृती नियोक्ता किंवा कंपनीच्या धोरणांचे आणि कार्यपद्धतींचे उल्लंघन करणार नाहीत.
 • हा कोड व्हायरस किंवा मालवेअरपासून मुक्त असल्याची सहभागी खात्री करून घेतील.
 • सहभागी या स्पर्धेचा वापर बेकायदेशीर, दिशाभूल करणारे, द्वेषपूर्ण किंवा भेदभावपूर्ण असे कृत्य करण्यासाठी करणार नाहीत.
 • स्पर्धकांनी विजेत्या अ‍ॅप्लिकेशनला एक वर्षभर कार्यरत स्थितीत ठेवले पाहिजे. यामध्ये कोणतीही कार्यात्मक सुधारणा अपेक्षित नाही, परंतु दस्तऐवजीकरणातील वर्णनानुसार कोणताही बग आढळल्यास त्याबाबत अहवाल दिल्यानंतर ताबडतोब दुरुस्त केला गेला पाहिजे.
 • जर कोणत्याही सहभागीने स्पर्धेच्या अटींचे उल्लंघन केले असल्याचे सिद्ध झाले तर, DARPG/NIC कडे पूर्वसूचना न देता सहभागीला अपात्र ठरवण्याचे सर्व अधिकार आहेत.
 • जर निवडण्यात आलेले अर्ज ज्युरीच्या अपेक्षा पूर्ण करत नसतील, तर ज्युरीला एक किंवा अधिक श्रेणी/उपश्रेणीमध्ये पुरस्कार न देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
 • ज्युरीचा निर्णय अंतिम असेल आणि त्याला आव्हान दिले जाऊ शकत नाही.
 • आवश्यक असल्यास, DARPG अटी आणि शर्तींमध्ये बदल करू शकते.
 • कार्यक्रमातून कोणत्याही व्यक्तीचा/संघाचा सहभाग मागे घेण्याचा किंवा या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी कोणतेही सादरीकरण नाकारण्याचा अधिकार आयोजक त्यांच्याकडे राखून ठेवतात.

मूल्यांकन आणि मानांकन निकष

सर्व अ‍ॅप्लिकेशनचे मूल्यांकन खाली सूचीबद्ध केलेल्या मापदंडांवर केले जाईल.

 • संकल्पना: सादरीकरणात विघटनकारी आणि अद्वितीय नागरिक-केंद्रित संकल्पना असणे आवश्यक आहे;

 • वापरकर्त्याचा अनुभव: सादरीकरणामध्ये सोप्या नेव्हिगेशनसह सोयीस्कर युजर इंटरफेस प्रदान करणे आवश्यक आहे;

 • प्रतिसादात्मक (विलंब न करता): सादरीकरणाने वापरकर्त्याच्या इनपुटला त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे;

 • गुणवत्ता: हे सादरीकरण एक कार्य करणारे प्रोटोटाईप असणे आवश्यक आहे;

 • टिकून राहण्याची क्षमता: संघाने सादर केलेल्या प्रोटोटाईपला अपडेट करणे, टिकवून ठेवणे आणि सतत वापरण्यायोग्य बनवण्यासाठी पुरेशा प्रमाणात योजना सादर केली पाहिजे; आणि

 • तंत्रज्ञान: सादरीकरणाने AI, ML, Blockchain इत्यादी सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

या हॅकेथॉनचा उद्देश काय आहे?

भारत सरकारच्या नागरिक तक्रार निवारण प्रणालीचा अनुभव आणि कामगिरी सुधारण्यासाठी डेटा आधारित उपाय विकसित करण्यासाठी भारतीय विद्यार्थी, संशोधक आणि नवोत्पादकांना आमंत्रित करणे हा या हॅकेथॉनचा उद्देश आहे.

हॅकेथॉनमध्ये कोण सहभागी होऊ शकते?

भारतीय विद्यार्थी किंवा शैक्षणिक संस्थांशी संबंधित संशोधक किंवा भारतीय स्टार्टअप्स आणि कंपन्यांशी संबंधित कार्यरत व्यावसायिक हॅकेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात. मात्र, सहभागी व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे असावे.

सहभागी संघ तयार करू शकतात का?

होय, सहभागींनी किमान एक संघ प्रमुखासह जास्तीत जास्त पाच सदस्यांचा संघ तयार करणे अपेक्षित आहे.

एखादा सहभागी अनेक संघांचा भाग असू शकतो का?

नाही, एक सहभागी केवळ एकाच संघाचा सदस्य म्हणून नोंदणी करू शकतो.

DARPG आणि NIC चे कर्मचारी सहभागी होण्यास पात्र आहेत का?

नाही, DARPG आणि NIC चे कर्मचारी हॅकेथॉनमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत.

हॅकेथॉनसाठी नोंदणी कशी करता येईल?

कृपया अधिकृत कार्यक्रमाच्या पेजला भेट द्या OGD कार्यक्रमची वेबसाईट

सहभागींनी कोणत्याही विशिष्ट प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे का?

होय, सर्व सहभागींनी मायगव्ह/जनपरीचय किंवा OGD प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

हॅकेथॉनसाठी देण्यात आलेल्या समस्या कोणत्या आहेत?

कृपया कार्यक्रमाच्या अधिकृत पेजवर समस्यांचे तपशील वाचा.

नागरिकांकडून ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी भारत सरकार विशिष्ट पोर्टल चालवते का?

होय, केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) ही भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) द्वारे चालवली जाणारी प्रणाली आहे. याद्वारे नागरिकांना सेवा वितरणाशी संबंधित कोणत्याही विषयावर कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे त्यांच्या तक्रारी सादर करता येतात. भारत सरकार आणि राज्य सरकारांची सर्व मंत्रालये आणि विभागांशी जोडलेले हे एकच पोर्टल आहे.

हॅकेथॉनचे आयोजन कसे केले जाईल? त्यासाठी वैयक्तिक सहभाग आवश्यक आहे का?

हॅकेथॉन एक ऑनलाइन कार्यक्रम म्हणून आयोजित केला जाईल ज्यामध्ये सहभागींची नोंदणी, प्रत्येक समस्येसाठी वापरल्या जाणाऱ्या डेटासेटमध्ये प्रवेश करणे आणि विकसित प्रोटोटाईप सादर करणे यासारख्या प्रक्रियांचा समावेश असेल.

हॅकेथॉनची कालमर्यादा काय आहे?

सहभागींची नोंदणी सुरू झाल्यापासून विकसित प्रोटोटाईप सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत एकूण 45 दिवसांच्या कालावधीत हॅकेथॉन आयोजित केले जाणार आहे.

सहभागींना कोणती माहिती पुरवली जाईल?

नोंदणीकृत सहभागींना प्रदान केले जाणारे डेटासेट संबंधित सहभागींनी उपाय शोधण्यासाठी निवडलेल्या समस्येनुसार भिन्न असतील. संबंधित समस्यांशी निगडीत डेटासेटबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया कार्यक्रमाच्या अधिकृत पेजवर समस्यांचे तपशील वाचा.

मूल्यांकनासाठी काय सादर करणे आवश्यक आहे?

नोंदणीकृत सहभागींनी मूल्यांकनासाठी सादर करावयाचे विकसित डेटासेट संबंधित सहभागींनी उपाय शोधण्यासाठी निवडलेल्या समस्येनुसार भिन्न असतील. संबंधित समस्यांशी निगडीत अपेक्षित प्रोटोटाईप आउटपुट/उपायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया कार्यक्रमाच्या अधिकृत पेजवर समस्यांचे तपशील वाचा.

मूल्यांकनासाठी कोणतेही परीक्षक असतील का?

होय, प्रत्येक समस्या श्रेणीबाबत उपाय म्हणून सादर केलेल्या प्रोटोटाईपचे मूल्यांकन करण्यासाठी आयोजक विविध संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या परीक्षकांची नियुक्ती करतील.

निवडलेल्या प्रवेशिकांसाठी काय बक्षिसे आहेत?

संबंधित क्षेत्रातील तज्ञांना परीक्षक म्हणून नियुक्त केले जाईल आणि हे परीक्षक सर्व 5 समस्या श्रेणींमधील सादरीकरणाचे मूल्यांकन करून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 संघांची निवड करतील आणि या संघाना खालील बक्षिसे दिली जातील:

 • दोन लाख रुपये सर्वात नाविन्यपूर्ण डेटा आधारित उपायासाठी;

 • एक लाख रुपये दुसऱ्या सर्वात नाविन्यपूर्ण डेटा आधारित उपायासाठी; आणि

 • पन्नास हजार रुपये तिसऱ्या सर्वात नाविन्यपूर्ण डेटा आधारित उपायासाठी.

मूल्यांकनाचे निकष काय आहेत?

परीक्षक सादर केलेल्या प्रोटोटाईपचे मूल्यांकन खालील निकषांच्या आधारावर करतील.

 • संकल्पना: सादरीकरणात विघटनकारी आणि अद्वितीय नागरिक-केंद्रित संकल्पना असणे आवश्यक आहे;

 • वापरकर्त्याचा अनुभव: सादरीकरणामध्ये सोप्या नेव्हिगेशनसह सोयीस्कर युजर इंटरफेस प्रदान करणे आवश्यक आहे;

 • प्रतिसादात्मक (विलंब न करता): सादरीकरणाने वापरकर्त्याच्या इनपुटला त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे;

 • गुणवत्ता: हे सादरीकरण एक कार्य करणारे प्रोटोटाईप असणे आवश्यक आहे;

 • टिकून राहण्याची क्षमता: संघाने सादर केलेल्या प्रोटोटाईपला अपडेट करणे, टिकवून ठेवणे आणि सतत वापरण्यायोग्य बनवण्यासाठी पुरेशा प्रमाणात योजना सादर केली पाहिजे; आणि

 • तंत्रज्ञान: सादरीकरणाने AI, ML, Blockchain इत्यादी सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

तंत्रज्ञानाच्या वापरासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत का?

होय, सहभागी केवळ ओपन सोर्स परवान्याअंतर्गत मौलिक साहित्य सादर करू शकतात, ज्यात ओपन सोर्स परवान्याअंतर्गत उपलब्ध असलेले तृतीय-पक्ष घटक (जर असतील तर आणि सहभागींनी ठरविल्याप्रमाणे) समाविष्ट असू शकतात.

सहभागी कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात का?

सहभागींना AI, ML सारख्या नवीनतम उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

सहभागी व्यक्तीने खोटी माहिती दिल्यास काय होते?

हॅकेथॉनच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान किंवा नंतर चुकीची माहिती देणारा सहभागी अपात्र ठरेल.

सहभागींनी त्यांची संपर्क माहिती अद्ययावत ठेवली पाहिजे का?

होय, सहभागींनी योग्य संपर्क माहिती देणे आणि ती बदलल्यास व जेव्हा बदलली जाईल तेव्हा ही माहिती अद्ययावत करणे अनिवार्य आहे.

सादर करण्याच्या प्लॅटफॉर्मवर सहभागींची अनेक खाती असू शकतात का?

नाही, हॅकेथॉनसाठी नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सहभागीला फक्त एकच खाते तयार करता येऊ शकते. त्याचप्रमाणे, एक संघ त्याच्यासाठी फक्त एकच खाते तयार करू शकतो.

अ‍ॅप्लिकेशनची मौलिकता महत्त्वाची आहे का?

होय, सहभागींना त्यांचे कार्य मूल्यांकनासाठी सादर करण्यापूर्वी त्याची मौलिकता प्रमाणित करावी लागेल.

सहभागी पूर्वी प्रकाशित केलेले किंवा पुरस्कृत केलेले काम सादर करू शकतात का?

नाही, सादर केलेले प्रोटोटाईप या विशेषतः हॅकेथॉनसाठीच तयार केलेले असले पाहिजेत.

जर एखादा सहभागी नोकरी करत असेल आणि सहभागी होत असेल तर काय करावे?

या हॅकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यरत व्यावसायिकाने नोंदणी प्रक्रियेदरम्यान नियोक्त्याची संमती आणि नियोक्त्यांच्या धोरणांचे उल्लंघन न केल्याची पुष्टी देणे आवश्यक आहे.

सादर केलेल्या कोडवर काही निर्बंध आहेत का?

सादर करायच्या कोडमध्ये एडवेअर, रॅन्समवेअर, स्पायवेअर, व्हायरस, वर्म सारखे मालवेअर नसावेत.

सहभागींनी कोणत्या कायदेशीर अटींचे पालन केले पाहिजे?

सहभागींनी हॅकेथॉनच्या अटी आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे.

पुरस्कारप्राप्त प्रोटोटाईप विजेत्या अ‍ॅप्लिकेशनची किती काळ देखरेख केली पाहिजे?

सहभागी संघांनी हॅकेथॉनच्या समाप्तीनंतर प्रदान केलेले प्रोटोटाईप किमान एक वर्ष कार्यरत स्थितीत राखणे अपेक्षित आहे.

निर्णय घेण्यात परीक्षकांची भूमिका काय असते?

सादर केलेल्या सर्वात नाविन्यपूर्ण आणि आशादायक प्रोटोटाईपच्या पुरस्काराच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार परीक्षकांकडे असेल आणि त्याला आव्हान दिले जाऊ शकत नाही.

हॅकेथॉनच्या अटी आणि शर्ती बदलू शकतात का?

होय, DARPG त्याच्या गरजेनुसार हॅकेथॉनच्या अटी आणि शर्ती बदलू शकते.

टाइमलाइन

प्रारंभ तारीख 2 जानेवारी, 2024
समाप्ती तारीख 1st March, 2024